नाशिक - शहरातील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने केली. यावेळी माहिती अधिकाराला संपवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नाला विरोध दर्शवण्यात आला.
नाशकात माहिती अधिकार संपवण्याच्याविरोधात तीव्र निदर्शने - राष्ट्रपती
माहिती आयुक्तांचे वेतन आणि त्यांच्या नियुक्तीचा कालावधी दोन्ही बाबी केंद्र सरकारच्या नियंत्रणात आणण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. तसेच मोदी सरकार या दोन्ही बाबी लोकसभा आणि राज्यसभेतील बहुमताच्या जोरावर पुढे रेटत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
![नाशकात माहिती अधिकार संपवण्याच्याविरोधात तीव्र निदर्शने](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4009360-thumbnail-3x2-nsk.jpg)
माहिती आयुक्तांचे वेतन आणि त्यांच्या नियुक्तीचा कालावधी दोन्ही बाबी केंद्र सरकारच्या नियंत्रणात आणण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. तसेच मोदी सरकार या दोन्ही बाबी लोकसभा आणि राज्यसभेतील बहुमताच्या जोरावर पुढे रेटत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी माहितीच्या अधिकाराला वाचवण्याच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच राष्ट्रपतींनी आरटीआय दुरुस्ती कायद्यावर स्वाक्षरी करू नये, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी देण्यात आले. तसेच राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी पां. भा. करंजकर, शांताराम चव्हाण, सचिन मालेगावकर, डॉ. डी. एल, कराड यांच्यासोबत सामाजिक, राजकीय चळवळीतील कार्यकर्ते आणि माहिती अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.