नांदगाव (नाशिक) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आज नांदगांव तहसील कार्यालयात धरणे आंदोलन केले. लहान मुलीच्या हस्ते तहसीलदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी नांदगावला धरणे आंदोलन - नाशिक नांदगाव मराठा आरक्षण बातमी
नांदगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने नांदगांव तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सोशल डिस्टन्सचे नियम पाळत आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लहान मुलीच्या हस्ते तहसीलदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलन सुरू असताना तहसीलदार आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी करत गेल्या वर्षांपासून सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन आता आक्रमक झाले आहे. राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.आज नांदगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने नांदगांव तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सोशल डिस्टन्सचे नियम पाळत आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लहान मुलीच्या हस्ते तहसीलदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलन सुरू असताना तहसीलदार आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
निवेदन देण्यासाठी ऑफिसमध्ये या अशी अट तहसीलदार कुलकर्णी यांनी घातली. मात्र, साहेबांनी बाहेर यावे अशी कार्यकर्त्यांनी अट घातल्याने बराच वेळ वाद झाला. मात्र, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला व तहसीलदार यांना कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत बाहेर येण्यासाठी विनंती केली. कुलकर्णी यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारले. मात्र, अर्धा तास हा सर्व खेळ सुरू असल्याने थोडे तणावाचे वातावरण झाले होते.