नाशिक - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आम्हीही आग्रही असून आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या 27 टक्के आरक्षणाला धक्का लावू नये, अशी भूमिका घेत आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी व ओबीसींचे आरक्षण अबाधीत राहावे, यासह आोबीसींच्या विविध मागण्यासांठी तहसिदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी कोणाताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.