महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माथाडी कामगारांच्या विविध मागण्यासाठी येवल्यात सीटूचे धरणे आंदोलन - Centre of Indian Trade Unions agitation

संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाला संघटनेचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येवल्यात माथाडी कामगारांच्या विविध मागण्यासाठी  सीटूचे धरणे आंदोलन
येवल्यात माथाडी कामगारांच्या विविध मागण्यासाठी सीटूचे धरणे आंदोलन

By

Published : Nov 27, 2020, 9:26 PM IST

येवला (नाशिक) - येवल्यात सीटू संलग्न माथाडी कामगार आणि बांधकाम कामगारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाला संघटनेचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगारांच्या मागण्या....
बांधकाम कामगारांना पेन्शन लागू व्हावी, घरकुल मिळावे तसेच कोरोनामुळे नुकसान झालेल्या ट्रान्सपोर्ट व माथाडी कामगारांना 10 हजार आर्थिक सहाय्य द्यावे, शेती विषयक व कामगार विषयक कायदे मागे घ्यावे, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणी करून त्यांना आरोग्य विमा पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू करा, रेशन व्यवस्था बळकट करून त्यात रॉकेल व साखर सहित सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा, मनरेगांतर्गत 600 रुपये रोजगार वर 200 दिवस काम किंवा बेरोजगार भत्ता, शहरी भागासाठी रोजगार हमी कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी, माथाडी कामगारांना अपघात नुकसानभरपाई त्वरित मिळावी, माथाडी कामगारांच्या मजुरी लेव्हीत वाढ करावी, रेल्वे मालधक्यातील माथाडी कामगारांना रेल्वे पास मोफत करावा अशा विविध मागण्या करता सीटूच्या वतीने करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details