नाशिक- सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत, पीक कर्ज व इतर कृषी विषयक योजनांची माहिती घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बँक अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मालेगाव तळवडेच्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी सिंडिकेट बँकेला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना कोडल्याचा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती समजताच वडनेर खाकुर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर बँकेचे टाळे खोलण्यात आले.
ताळवाडेच्या सिंडिकेट बँकेला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे.. - talwade bank locked
काही दिवसांपूर्वी सुरळीत चालू असलेल्या शाखेचा व्यवहार बँक कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे त्रासदायक ठरत आहे. अनेक दिवसांपासून कुठल्याही खातेदाराचे बँक पासबुक प्रिंट केले जात नाही. तसेच पासबुक प्रिंट करण्यास खातेदार गेल्यास खातेदाराकडून बँक पासबुक प्रिंट करण्यासाठी शंभर रुपये अथवा दोनशे रुपये आकारले जात असल्याचा खातेदारांचा आरोप आहे. त्यामुळे येथे येणारे शेतकरी, ग्रामस्थ खातेदार संतापले होते.

मालेगाव तालुक्यातील ताळवाडे येथे सिंडिकेट बँकेची शाखा अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी सुरळीत चालू असलेल्या शाखेचा व्यवहार बँक कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे त्रासदायक ठरत आहे. अनेक दिवसांपासून कुठल्याही खातेदाराचे बँक पासबुक प्रिंट केले जात नाही. तसेच पासबुक प्रिंट करण्यास खातेदार गेल्यास खातेदाराकडून बँक पासबुक प्रिंट करण्यासाठी शंभर रुपये अथवा दोनशे रुपये आकारले जात असल्याचा खातेदारांचा आरोप आहे. त्यामुळे येथे येणारे शेतकरी, ग्रामस्थ खातेदार संतापले होते.
अखेर बँकेच्या या संतापजनक कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी आज(शनिवारी) सिंडिकेट बँकेच्या शाखेला टाळे ठोकले आणि कर्मचाऱ्यांना बँकेत कोंडले. याची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांची समजूत काढून बँक उघडण्यात आली. मात्र, यावेळी ग्रामस्थांनी हे बँक कर्मचारी गोरगरिबांना हाकलून लावतात, त्यांना पीक कर्ज, अथवा कुठल्याही योजनेची योग्य ती माहिती देत नाहीत, त्यामुळे लवकरात लवकर सिंडिकेट बँकेच्या तळवाडे येथील शाखेच्या कर्मचाऱ्याची बदली करण्याची मागणी केली.