महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकराशे किलो शेंदूर काढल्यानंतर सप्तशृंगी मातेच्या मूर्तीचे दिसले मनोहारी मूळ रूप - idol of Saptashringi Mata its original form

सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रियेनंतर सप्तशृंगी मातेचे मूळ रूप समोर आले आहे. देवीच्या मूर्तीवरून अकराशे किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर सप्तशृंगी देवीचे मूळ रूप समोर आले आहे. मागील 45 दिवसापासून मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. आता 26 सप्टेंबर घटस्थापनेपासून देवी दर्शन नागरिकांसाठी खुले होणार आहे.

अकराशे किलो शेंदूर काढल्यानंतर सप्तशृंगी मातेच्या मूर्तीचे दिसले मनोहारी मूळ रूप
अकराशे किलो शेंदूर काढल्यानंतर सप्तशृंगी मातेच्या मूर्तीचे दिसले मनोहारी मूळ रूप

By

Published : Sep 8, 2022, 8:08 PM IST

Updated : Sep 9, 2022, 2:51 PM IST

नाशिक - महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रियेनंतर भगवती मातेचे मूळ रूप समोर (idol of Saptashringi Mata its original form ) आले आहे. देवीच्या मूर्तीवरून अकराशे किलो शेंदूर (removing 1100 kilos of Shendur) काढण्यात आल्यानंतर सप्तशृंगी देवीचे मूळ रूप समोर आले आहे. मागील 45 दिवसापासून मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. आता 26 सप्टेंबर घटस्थापनेपासून देवी दर्शन नागरिकांसाठी खुले होणार आहे.


मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर देवीच्या रूपावरील मागील कित्येक वर्षापासून साचलेला शेंदूर लेपनाचा भाग हा धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला आहे. मंदिरात 6 ते 8 सप्टेंबर दरम्यान धार्मिक पूजा हवन विधीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पितृपक्षात 1600 देवी अथर्वशिर्ष पठण अनुष्ठान सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्र पूर्वी होणार आहे. तसेच 26 सप्टेंबर घटस्थापनेपासून देवी मातेचे दर्शनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे घटस्थापनेला सप्तशृंगी मातेच्या मूळ रूपाचं दर्शन सर्व भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी भाविकांनी व्यवस्थापनास सहकार्य करावे असे आवाहन विश्वस्तांच्या वतीने करण्यात आल होते.

अकराशे किलो शेंदूर काढल्यानंतर सप्तशृंगी मातेच्या मूर्तीचे दिसले मनोहारी मूळ रूप

वणी येथील सप्तशृंगी मातेचे मंदिर 45 दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 22 जुलैपासून 5 सप्टेंबर पर्यंत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणी येथील सप्तशृंगी मातेचे मंदिर बंद ठेवण्यात आले. देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अकराशे किलो शेंदूर काढल्यानंतर सप्तशृंगी मातेच्या मूर्तीचे दिसले मनोहारी मूळ रूप

भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन -या कालावधीतयेणाऱ्या भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शनाची सोय केली होती. यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने पहिल्या पायरीवर उपकार्यालयानजीक श्री भगवतीची हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली होती. भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद, भक्तीनिवास व इतर सुविधा मात्र कायम ठेवण्यात आल्या होत्या.

कोरोना काळात ही मंदिर होते बंद -कोरोनामुळे सलग दीड वर्षे सप्तशृंगी देवीच्या मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते.

Last Updated : Sep 9, 2022, 2:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details