नाशिक - संचारबंदी काळात पाण्याचे टँकर उपलब्ध होत नसल्याने मॅग्नम हॉस्पिटलचे कर्मचारी रस्त्यावरील दुभाजकांमधील झाडे वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेद्वारे पाणी घालत आहेत. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सरकारने संपूर्ण भारतभर संचारबंदी जारी केला आहे. याचा परिणाम नागरिकांच्या जीवनावर होत आहे. मात्र, शहर सुशोभिकरण करण्यासाठी लावण्यात आलेल्या झाडांनाही याचा तितकाच फटका बसत आहे. म्हणून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
नाशकात रूग्णांपाठोपाठ आता रुग्णवाहिका देतेय झाडांना जीवदान.. - nashik corona
मॅग्नम हॉस्पिटलचे कर्मचारी रस्त्यावरील दुभाजकांमधील झाडे वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेद्वारे पाणी घालत आहेत. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सरकारने संपूर्ण भारतभर संचारबंदी जारी केला आहे. याचा परिणाम नागरिकांच्या जीवनावर होत आहे. मात्र, शहर सुशोभिकरण करण्यासाठी लावण्यात आलेल्या झाडांनाही याचा तितकाच फटका बसत आहे.
सूर्याच्या दाहकतेमुळे रस्त्यांच्या कडेला लावलेले झाडे करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांची तहान भागवण्यासाठी नवनवीन कल्पना राबवण्यात येतात. शहरातील सौंदर्यात भर टाकणारे रस्त्याच्या दुभाजकांमध्ये असलेली झाडेदेखील पाण्याअभावी मान टाकत आहेत. प्रत्येक जण आपल्या जिवाची परवा करत घरात बंदिस्त आहेत. तसेच पाण्याचे टँकर उपलब्ध होत नसल्याने अनेक वृक्षवेली कोमेजून चालली आहे. अशात आता मॅग्नम हॉस्पिटलने झाडांच्या देखभालीसाठी रुग्णवाहिकेतून पाणी आणून दिले जात आहे. त्यामुळे आता ही रुग्णवाहिका रुग्णांपाठोपाठ झाडांसाठीदेखील संजीवनी ठरत आहे.