नाशिक- सुरगाणा तालुक्यातून मतदानाचा हक्क बजावून दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे कामाला जाताना मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने तीघांचा मृत्यू झाला.
मतदान करून ट्रीपलसीट जाणे बेतले जिवावर, तीघांचा अपघातात मृत्यू - Three youth died in road accident in nashik
मतदानाचा हक्क बजावून दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे कामाला जाताना मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने तीघांचा मृत्यू झाला

पोलिसांकडून मिळालेल्या माहीती नुसार, यादव मुरलीधर जाधव, रामदास बन्सी पवार, भोलेनाथ जिवला कडाळे हे धुमी (ता. सुरगाणा) येथून मतदानाचा हक्क बजावून येत असताना कोशिंबे (ता. दिंडोरी) शिवारात मोटर सायकलचे नियत्रंण सुटले. मोटार सायकल (क्र. एम एच 15 सी एक्स 4977) ही खड्ड्यात कोसळल्याने तिघांना जबर मार लागला. त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉ. बागुल यांनी मृत घोषीत केले.
सदर घटनेची माहीती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांनी पंचनामा करुन मृतांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पुढील तपास जाधव करत आहे.