निफाड :भारत देशातील आसाम राज्यामध्ये गुवाहाटी येथे एकमेव कामाख्या देवीचे मंदिर असुन या कामाख्या शक्तिपीठावर लोकांची विशेष श्रध्दा आहे. हे देशातील एकमेव मंदिर असुन देशात इतर कोठेही या देवीचे मंदिर नाही. मात्र, आता नाशिक जिल्ह्यातील पुर्व दिशेला असलेल्या धारणगांव खडक येथे कामाख्या देवीचे गुवाहटी नंतर दुसऱ्या मंदिराची निर्मीती होत आहे. सुमारे दोन एकरावर सिध्द कामाख्या देवी मंदिराची निर्मिती होत असून, दोन एकर श्रेत्रापैकी सुमारे ५६ हजार स्केअर फुट (सव्वा एकर) क्षेत्रावर मंदिराचे बांधकाम पुर्णत्वाकडे आहे.
महाराष्ट्रातील एकमेव कामाख्या देवीचे मंदिर :या मंदिराची उभारणी सुमारे १११ खांबांवर करण्य़ात आलेली असुन प्रत्येक खांबाच्या चहुबाजुने देव-देविकांच्या मुर्त्यांच्या प्रतिकृती कोरण्यात आलेल्या आहेत. या मंदिराच्या उभारणीसाठी बंगाल, मध्यप्रदेश, नांदेड, राजस्थान येथील सुमारे २५० कारागिर मेहनत घेत आहे. गणेश महाराज जगताप यांच्या प्रयत्नातुन महाराष्ट्रातील एकमेव कामाख्या देवीचे मंदिर तयार होत आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारातुन आत प्रवेश केल्यावर पुर्व बाजुने भव्यदिव्य आणि आकर्षक श्री गणेश मंदिर आहेत. तर पश्चिमेला शिवपार्वती मंदिर निर्मिती होतेय. उत्तर बाजुला धन कुबेर, धनलक्ष्मी, धनदिप या देवतांच्या मंदिरांची निर्मीती करण्यात आलेली आहेत.
देशातील एकमेव मंदिर :देशातील आसाम राज्यामध्ये गुवाहाटी येथे एकमेव कामाख्या देवीचे मंदिर असुन या कामाख्या शक्तिपीठावर लोकांची विशेष श्रध्दा आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णु यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीरचे ५१ भाग केले होते. ज्या ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले ते-ते ठिकाण शक्तीपीठ रुपाने प्रसिध्द झाले. या मंदिराचे महत्व म्हणजे या मंदिरामध्ये देवीची मुर्ती नाही. कामाख्या येथे सती देवीच्या योनीचा भाग पडल्याने तेथे योनीभागाची स्थापना करत शक्तीपीठ उदयास आलेले आहे. हे देशातील एकमेव मंदिर असुन देशात इतर कोठेही या देवीचे मंदिर नाही.
मंदिराचे बांधकाम पुर्णत्वाकडे :नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पुर्व दिशेला असलेले धारणगांव खडक येथील गणेश महाराज जगताप हे वास्तव्यास आहेत. त्यांना सती देवीने स्वप्नात येवुन दिलेल्या दृष्टांतानंतर धारणगांव खडक येथे कामाख्या देवीच्या मंदिराची निर्मीती होत आहे. निफाड तालुक्यातील धारणगांव खडक येथे मंदिराचे बांधकाम पुर्णत्वाकडे आहे. भव्यदिव्य अशा प्रवेश द्वाराची निर्मीती अंतीम टप्यात आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर पुर्व बाजुने भव्यदिव्य आणि आकर्षक श्री गणेश मंदिर, पश्चिमेला शिवपार्वती मंदिर तर उत्तर बाजुला धन कुबेर, धनलक्ष्मी व धनदीप या देवतांच्या मंदिरांची निर्मीती करण्यात आलेली आहेत. तसेच मंदिराच्या आग्नेय दिशेला भव्य सप्तशती चंडी हवन बनविण्यात आलेले आहे.