महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर येवल्यातील कांदा लिलाव सुरू, पहिल्या दिवशी 900 ट्रॅक्टरची आवक

गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव तसेच भुसार लिलाव आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत. आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 900 ट्रॅक्टरची आवक झाली आहे.

10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर येवल्यातील कांदा लिलाव सुरू
10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर येवल्यातील कांदा लिलाव सुरू

By

Published : Apr 5, 2021, 4:02 PM IST

येवला ( नाशिक ) - गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव तसेच भुसार लिलाव आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत.

कांद्याची आवक जास्त

कांदा लिलाव सुरू झाल्याने, शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अंदरसुल उपबाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होताना दिसत आहे. कांद्याला योग्य दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गांमधून व्यक्त होत आहे.

10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर येवल्यातील कांदा लिलाव सुरू

येवला कांदा बाजार भाव

येवला बाजार समितीत दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी लाल कांद्याला किमान 300 रु. तर कमाल 865 रुपयांचा दर मिळताना दिसत आहे. आज बाजार समितीमध्ये तब्बल 900 ट्रॅक्टरची आवक झाल्याची माहिती समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तर अंदरसुल उपबाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान रु. 300 ते कमाल 800 रुपयांचा भाव मिळत आहे. तर उन्हाळी कांद्याला किमान रु. 300 ते कमाल 750 रुपयांचा भाव मिळत आहे. अंदरसुलमध्ये आतापर्यंत 600 ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली आहे.

हेही वाचा -'पत्रकारही फ्रंटलाईन वॉरियर्स, त्यांनाही प्राधान्याने लस द्या'

ABOUT THE AUTHOR

...view details