नाशिक Adulterated Paneer Seized :शहरात अन्न-औषध प्रशासनानं दिवाळीच्या तोंडवार मोठी कारवाई केला आहे. यावेळी अन्न-औषध प्रशासनानं सुमारे 397 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलं आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्यासाठी काही जण भेसळ करत असल्याचं दिसून येत आहे. अशा भेसळयुक्त पदार्थामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. भेसळयुक्त पदार्थ विक्रेत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केलीय.
पनीर मिठाईत भेसळ :दिवाळीत दूध, पनीर मिठाईत भेसळ होत आहे. नाशिकमध्ये 397 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. शहरातील दुर्गा मंदिर दुकानामागील विराज एंटरप्रायझेस, त्रिमूर्ती चौक येथील विराज एंटरप्रायझेसमध्ये भेसळ होत असल्याच्या संशयावरून 74 किलोचा साठा जप्त करण्यात आला. सुमारे 16 हजार रुपयांचा माल यावेळी नष्ट करण्यात आला. दरम्यान, अंबड परिसरात साई एंटरप्रायझेसचं 67 हजार रुपये किमतीचं 323 किलो पनीर नष्ट करण्यात आलं. या पनीरचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढील आवश्यक कारवाई केली जाईल, असं एका अधिकाऱ्यांनं सांगितलं.