नाशिक :अधिकमास हा अतिशय पवित्र महिना समजला जातो.अधिक महिन्यात जावई आणि मुलीला सोने आणि चांदीच्या स्वरूपात भेट दिली जाते. तसेच दिपदानाचेही महत्त्व आहे. यात चांदी आणि तांब्याचे दिवे भेट म्हणून दिले जातात. मंदिरात तांब्याचे दिवे प्रज्वलित केले जातात. गृहिणी या काळात जोडव्यांमध्ये चांदीची भर टाकतात. सध्या जोडव्यांचे नवनवीन डिझाईन बाजारात आले आहेत. चांदीचे जोडवे 1 ग्रॅमपासून 100 ग्रॅमपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. तसेच चांदीचे ताट, समई, निरंजन, ताम्हण आणि नवीन डिझाईन असलेले इटालियन जोडव्याचे प्रकार देखील बघायला मिळत आहे. या महिन्यात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे 33 दिवे आणि 33 अनारसे दान स्वरूपात दिले जातात.
Adhik Maas 2023: भाव वाढूनही चांदीच्या दिव्यासह जोडव्यांची वाढली मागणी, अधिकमासानिमित्ताने लेक-जावयाला दिली जाते भेट - अधिकमास अमावस्या कधी आहे
अधिकमासाला 18 जुलैपासून सुरुवात झाली आहे. तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासानिमित्ताने लेक आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा अवतार मानून सोन्या-चांदीचे वाण दिले जातात. यासाठी चांदीला पसंती दिली जात आहे. चांदीचे भाव वाढले असले तरी बाजारपेठेते चांदीचे दिवे आणि जोडव्यांची मागणी वाढली आहे.
चांदीचे भाव वाढले :2023 जानेवारीच्या पहिल्याच महिन्यात चांदीचे भाव 70 हजार 600 रुपये किलो इतका होता. अवघ्या सात महिन्यात चांदीचा भाव 77 हजार रुपये किलो इतकी झाली आहे, येत्या काळात चांदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे भाव एक लाखापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2020 मध्ये कोरोनाचे सावट होते. त्यामुळे अधिकमास मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. यंदा 2023 मध्ये चांदीचे भाव जरी वाढले आहे, तरी देखील ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. चांदीचे ताट, निरंजन, समयी, डिनर सेट अशा वस्तूंना मागणी वाढली आहे, असे सराफ व्यवसायिक मयूर शहाणे यांनी सांगितले.
वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा :कोरोनामुळे आम्ही मागील अधिकमास साजरा केला नव्हता. मात्र यंदा साजरा करत आहोत. यासाठी मी एक चांदीचे ताट आणि निरंजन खरेदी केली आहे. चांदीचे भाव वाढले असले तरी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे. आता आम्ही लेक आणि जावईला घरी बोलावून त्यांची पूजा करणार आहोत. जेवण देऊन त्यांना या वस्तू वाण म्हणून देणार आहे, असे गृहिणी नलिनी पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा :