नाशिक -मीराताई बोराटे यांची त्र्यंबकेश्वर जवळील दुगाव येथे शेतजमीन होती. त्याबाबत बोराटे कुटुंबीय यांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. मात्र, अभिनेते दिलीप कुमार व त्यांच्या भावांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या मदतीने सदरची जमीन न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही त्यांच्या नावावर करून घेतली होती. याप्रकरणी त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी दोनवेळा समन्स देण्यात आले होते. मात्र, ते हजर न झाल्यामुळे त्यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयाने वॉरंट काढले होते. नंतर ते याठिकाणी आले व संबंधित प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला. दरम्यान, यावर चर्चा करून तोडगा काढल्याचा अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबतचा अनुभव हा अॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी सांगितला आहे.
- फौजदारी खटल्यात न्यायालयात हजर राहण्याची ही पहिलीच वेळ -
मीराताई व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक करून तलाठी आणि सर्कल यांना हाताशी धरून दिलीप कुमार आणि त्यांचे भाऊ यांनी ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती. हे प्रकरण दिवाणी होते. तरीही या प्रकरणात मीराताई बोराटे यांच्या बाजूने अॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी नाशिक न्यायालयात भा. द. वि. कलम 420, 468, 471, 34 आदि कलमाप्रमाणे फौजदारी खटला दाखल केला. या खटल्यात दिलीप कुमार यांना जुहू येथील त्यांच्या घरी जाऊन समन्स बजावण्यात आला होता. तरीही ते नाशिक न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यानंतर न्यायालयाने अभिनेते दिलीप कुमार यांचे वॉरंट काढले होते. शेवटी न्यायालयाने वारंट काढल्यानंतर दिलीप कुमार नाशिकला न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्या जामीन अर्जास अॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी विरोध केला होता. दिलीप कुमार यांची फौजदारी खटल्यात न्यायालयात हजर राहण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी अतिशय नम्रपणे निवेदन केले होते. न्यायालयाने त्यांना जामीन देऊन मुक्तता केली होती.
- तडजोड करण्यात आली होती -