नाशिक- दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्या नाशिकच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदा त्यांनी कार्ड बोर्ड पासून आकर्षक पर्यावरण पूरक आरास साकारली आहे. सह कुटुंब एकत्र येत अभिजित यांनी बाप्पाचे स्वागत केले.
हेही वाचा - राज्यात आठ महिन्यात स्वाईन फ्लूचे 197 बळी, नाशिकमध्ये सर्वाधिक 33
अभिजीत त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुखदा खांडकेकर आणि आई-वडिलांनी एकत्रित बाप्पाची मनोभावे पूजा केली. यंदाच्या वर्षी कार्ड बोर्ड पासून आकर्षक पर्यवरण पूरक कमळाची प्रतिकृती असलेली आरास त्यांनी साकारली आहे. सर्वांनी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन देखील अभिजितने केले आहे.
अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या घरी बाप्पाचे आगमन हेही वाचा - मुंबईनाका पोलिसांकडून ६ लाखांचा गुटखा जप्त
येत्या ऑक्टोबर महिन्यात माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे एक हजार भाग पूर्ण होत असून प्रेक्षकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल अभिजित यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. मालिकेत माझी निगेटिव्ह भूमिका असून सुद्धा नागरिकांना माझे काम आवडत असल्याचे त्याने आवर्जून सांगितले. गेल्या आठ दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची आम्ही तयारी करत असल्याचे सुखदा खांडकेकर यांनी सांगितले. तसेच बाप्पा सोबत अभिजितला देखील उकडीचे मोदक आवडत असल्याने या काळात अभिजित डाएट बाजुला ठेवत असल्याचे सुखदा यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या घरी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना