नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता नाशिक जिल्ह्याची हद्द प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र,अशातही काही मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. अशा प्रवाशांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आता पोलिसांनी दिला आहे.
मालवाहतुकीच्या वाहनांमध्ये प्रवासी आढळल्यास कारवाई, पोलिसांचा इशारा - corona effect in nashik
नाशिक जिल्ह्याची सीमा प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र,अशातही काही मालवाहतूक वाकरणाऱ्या वाहनांमधून नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. अशा प्रवाशांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आता पोलिसांनी दिला आहे.
मालवातूक वाहनांमध्ये प्रवासी आढळल्यास कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, अशा प्रकारची कोणतीही वाहतूक आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. यासोबतच, मालवाहतूक वाहनामध्ये प्रवासी आढळून आल्यास त्यांची सर्व माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.