रत्नागिरी- जिल्ह्यात आंबा वाहतूक करण्याच्या बहाण्याने विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने वाहनातील १३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अवैद्य विदेशी दारु वाहतुकीवर कारवाई; १३ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त - nashik
आंबा वाहतूक करण्याच्या बहाण्याने विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने वाहनातील १३ लाख ३४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात विदेशी मद्य विक्रीसाठी प्रतिबंधित असतानाही नाशिकमध्ये अवैधरित्या दारु वाहतूक करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला नाशिकपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. तेव्हा भरारी पथकाने साफळा रचला. तेव्हा एका वाहनाच्या तपासणी दरम्यान मागील बाजूस आंब्याचे भरलेले रॅकेट आढळून आले. त्यावर पोलिसांनी अधिक तपासणी केली असतान त्या रॅकेटच्या पाठीमागील बाजूस विदेशी दारुचे बॉक्स आढळून आले.
तेव्हा राज्य शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाने या कारवाईत एकूण १३ लाख ३४ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणात वाहनचालक कमलेश राठोड याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक आणि विभागी भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश रावते यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक करीत आहेत.