महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये एटीएम फोडीचे सत्र पुन्हा सुरू; कारंजातील 'पीएनबी'चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न - punjab national bank atm

कारंजा शहरातील मध्यवर्ती भागातील पंजाब नॅशनल बँके(पीएनबी)चे एटीएम फोडताना एका संशयिताला रंगेहाथ पकडण्यात पोलीस बिट मार्शल यांना यश आले आहे.

नाशिकमध्ये एटीएम फोडीचे सत्र पुन्हा सुरू

By

Published : Nov 19, 2019, 9:54 AM IST

Updated : Nov 19, 2019, 12:45 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील कारंजा शहरातील मध्यवर्ती भागातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली. यामुळे बँक एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे हे एटीएम फोडताना एका संशयिताला रंगेहाथ पकडण्यात पोलीस बिट मार्शल यांना यश आले आहे.

नाशिकमध्ये एटीएम फोडीचे सत्र पुन्हा सुरू

दिवसेंदिवस एटीएम फोडण्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. यामुळे बँक एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सोमवारी कारंजा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये कोणीतरी संशयित व्यक्ती असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या बिट मार्शलला जवळच असलेल्या सुरक्षा रक्षकांनी दिली होती. या संशयित आरोपीने जवळच्याच मंदिरातील त्रिशूळ चोरला आणि त्याच्या सहाय्याने तो एटीएम फोडत होता. दरम्यान, पोलिसांनी वेळीच एटीएमजवळ पोहोचून त्याला ताब्यात घेतले. यामुळे एटीएममधील पैशांची चोरी होता होता राहिली. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात आणि रस्त्यालगत असणारे एटीएम फोडण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

हेही वाचा -इगतपुरीत कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

यापूर्वी देखील अशाच एटीएम फोडीच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. तर, दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने एटीएम सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जिल्ह्यातील अनेक एटीएम मशीनबाहेर सुरक्षारक्षक नसणे, सीसीटीव्ही तसेच अर्लाम सुविधा उपलब्ध नसल्याने अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, तर पोलिसांबरोबरच बँकाचेसुद्धा एटीएम मशीनच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा -अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटरसायकलस्वार ठार

Last Updated : Nov 19, 2019, 12:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details