नाशिक - शहरात बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागले आहे. घरात भांडणे लावणे, अपमानकारक बोलणे या कारणावरून सुनेनेच सासुचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
संशयित आरोपी छाया पाटील हिने सासू मंदाकिनी पाटील यांच्या डोक्यात रॉड मारून त्यांचा खून केला. मोठ्या शिताफीने हा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत टाकून फेकून दिला होता. दरम्यानच्या काळात नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात मंदाकिनी पाटील बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांना दाखल केली होती. महिलेचा शोध घेणाऱ्यास कुटुंबीयांनी २५ हजारांचे बक्षीसही जाहीर केले होते. या घटनाक्रमानंतर चार दिवसांनी या महिलेचा मृतदेह घराशेजारी बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता.