नाशिक- जिल्हा रुग्णालयातून आरोग्य तपासणीसाठी आणलेला एक आरोपी फरार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. अशोक दत्ता पारवे (वय- 24) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयातून बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार - नाशिक
आरोपीविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करूण तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयातून बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार
या आरोपीविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करूण तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपीला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता आरोपी पोलिसांना चकवा देत रुग्णालयाच्या गेट क्रमांक 1 मधून फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी सर्व यंत्रणा कार्यान्वित केली असून रात्री उशिरापर्यंत आरोपीचा तपास लागला नव्हता.