महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना नाशिकच्या जवानाचा अपघाती मृत्यू - नाशीकच्या जवानाचा अपघाती मृत्यू

श्रीनगर येथे कर्तव्य बजावत असताना नाशिकचे जवान सागर चौधरी यांचा त्यांच्याकडील बंदुकीची गोळी लागल्याने मृत्यू झाला. त्याचे पार्थिव विशेष विमानाने नाशिकला आणले जाणार आहे.

जवान सागर चौधरी

By

Published : Sep 28, 2019, 1:28 PM IST

नाशिक - श्रीनगर येथे कर्तव्य बजावत असताना जवान सागर चौधरी यांचा त्यांच्याकडील बंदुकीची गोळी लागल्याने अपघाती मृत्यू झाला. सागर हे आई वडिलांना एकुलते एक होते. सागर यांच्या जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते निफाड तालुक्यातील भडवस गावचे रहिवाशी आहेत.

जवान सागर यांचे पार्थिव विशेष विमानाने नाशिकला येणार आहे. सागर चौधरी यांच्यावर भडवस या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details