महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक-मालेगाव रस्त्यावर अपघात; पती-पत्नीसह मुलगी ठार - Accident on Nashik-Malegaon Road

नाशिक-मालेगाव रस्त्यावर टेम्पो-दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी आणि मुलगी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर प्रशासनाने चाळीसगाव-चौफुली रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आश्वासन मागे घेण्यात आले.

News Nashik
नाशिक-मालेगाव रस्त्यावर अपघात; पती-पत्नीसह मुलगी ठार

By

Published : Feb 9, 2021, 6:06 PM IST

Updated : Feb 9, 2021, 7:12 PM IST

नाशिक : जिल्ह्यातील चाळीसगाव चौफुली येथे झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. नाशिक-मालेगाव रस्त्यावर टेम्पो-दुचाकीच्या या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी आणि मुलगी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर स्थानिकांचा रास्ता रोको..

मिळालेल्या माहितीनुसार, या टेम्पोने दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळु दुचाकीवर असलेल्या कुटुंबाचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर प्रशासनाने चाळीसगाव-चौफुली रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Last Updated : Feb 9, 2021, 7:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details