महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनमाड-नांदगांव रस्त्यावर मोटारसायकलला ट्रकची धडक, दोन ठार - nashik police accident

मनमाड-नांदगाव रस्त्यावर ट्रक व दुचाकीमध्ये हिसवळ शिवारात भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेत दुचाकीवारील आई आणि मुलगी जागीच ठार झाली असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला तातडीने मालेगाव येथे उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

manmad civil hospital
मनमाड उपजिल्हा रुग्णालय

By

Published : Dec 15, 2019, 4:28 PM IST

नाशिक -मनमाड-नांदगाव रस्त्यावर ट्रक व दुचाकीमध्ये हिसवळ शिवारात भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेत दुचाकीवारील आई आणि मुलगी जागीच ठार झाली असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला तातडीने मालेगाव येथे उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

मनमाड-नांदगांव रस्त्यावर मोटारसायकल व ट्रक अपघातामध्ये दोन ठार तर एक जखमी

हेही वाचा - पैशांच्या वादातून वृद्धाचे मुंबईतून अपहरण, तर गुजरातमध्ये हत्या

नांदगाव येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी दुचाकीवरून निघालेले कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. ट्रकने दिलेल्या धडकेत जोया इकबाल खान या मुलीचा तर आई अपसाना इकबाल खान यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालक इकबाल खान हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून मालेगाव येथे उपचारांसाठी पाठविण्यात आले. खान यांचे नांदगाव येथे मोबाईल विक्रीचे दुकान आहे.

हेही वाचा - मंचर-बेल्हे रस्त्यावर पिकअप-रिक्षाचा अपघात, तिघांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details