महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर बरसले; म्हणाले, 'गद्दार नजरेला नजर मिळवू...' - आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर टीका

४० गद्दार नजरेला नजर मिळवू शकत नाही. गद्दारांना हिंदुत्वाचा पुळका आताच का आला?. पक्षाचा आदेश सर्वोच्च असतो तो तुम्ही का पाळला नाही?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केला ( Aaditya Thackeray Attacked On Shivsena Rebel MLA ) आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

By

Published : Jul 22, 2022, 4:14 PM IST

मनमाड ( नाशिक ) - गद्दारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला व त्यांच्या खुर्चीवर बसले. त्यांना उत्तर देण्यासाठी मी आलेलो नाही. ४० गद्दार नजरेला नजर मिळवू शकत नाही. गद्दारांना हिंदुत्वाचा पुळका आताच का आला?. सत्तेत होते तेव्हा अडीच वर्ष गप्प का राहीले?. पक्षाचा आदेश सर्वोच्च असतो तो तुम्ही का पाळला नाही?. त्यामुळे शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही, असे खडे बोल आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सुनवाले आहेत. मनमाडला आयोजित शिव संवाद यात्रेनिमित्ताने ते बोलत ( Aaditya Thackeray Attacked On Shivsena Rebel MLA )होते.

'आमदार विकले गेले' -आदित्य ठाकरे म्हणाले की, लिहून घ्या. हे तात्पुरते अल्पमतातील सरकार आहे. मी विकलो गेलो नाही, आमदार विकले गेले. राजकारण घाणेरडे झालं, माणुसकी तोडून राजकारण सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे भेटत नव्हते, असा आरोप केला. पण, दोन गंभीर शस्त्रक्रिया झाल्या म्हणून भेटले नाही, त्यांचं दुःख मी बघितलं. मुलगा म्हणून मी जवळ होतो. आजारी असतांनाही उद्धव ठाकरेंनी काम थांबवले नाही. महाराष्ट्राची सेवा थांबविली नाही. आजारपणाचा फायदा घेत गद्दारांनी आमदार जमविले. ते आमदार विकले गेले, असा टोला बंडखोर आमदारांना लगावला आहे.

आदित्य ठाकेर कार्यकर्त्यांना संबोधित करताना

'विधानसभा, लोकसभेत पुन्हा ताकद दाखवा' -गद्दार नेते गेले. मात्र, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागावे. विधानसभा, लोकसभेत पुन्हा ताकद दाखवा. तुम्हा शिवसैनिकांना पुन्हा नव्याने संधी उपलब्ध होणार आहे, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा -Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेबाबत कोणतेही धोरण राबवलं नाही; नरेश मस्केंचे उद्धव ठाकरेंवर धक्कादायक आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details