नाशिक - महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करून न घेतलेल्या एका महिलेची प्रसूती गुरुवारी (3 सप्टेंबर) रस्त्यावरच झाली होती. त्यानतंर त्या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या महिलेला व तिच्या बाळाला तातडीने जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे.
सिडको भागातील मोरवाडी येथील महानगरपालिकेच्या प्रसूती रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या एका गरोदर महिलेची प्रसूती रस्त्यातच झाली होती. त्यावेळी स्थानिक नगरसेविका भाग्यश्री डोमसे यांनी तत्काळ परिसरातील महिलांच्या मदतीने त्या महिलेला धीर देत तिची महिलेची प्रसुती भर रस्त्यात केली. या महिलेने एक गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाबाबत सर्वत्र टीका झाली होती. यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली व तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिला व तिच्या बाळाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे.
तीच महिला निघून गेली - डॉ. मोगल