नाशिक - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. तर सुरगाणा येथील तान नदीचा पूल ओलांडताना जिल्हा परिषद शाळेचा एक शिक्षक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण गावित असे त्या शिक्षकाचे नाव आहे. ते उबराचापाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत होते.
नाशकातील तान नदीच्या पुरात वाहून गेल्याने शिक्षकाचा मृत्यू - तान नदी
ऊबराचापाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक लक्ष्मण गावित हे सुरगाणा येथील तान नदीवरील पुल ओलांडताना वाहुन गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
राज्यात ठिकठिकाणी पावसाचा कहर सुरू असून त्यामुळे रोज विविध घटना घडत आहेत. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे, तर कुठे पुराने भयंकर नुकसान केले आहे. अशीच एक घटना सुरगाणा येथील तान नदीला पूर आल्याने घडली. ऊबराचापाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक लक्ष्मण गावित हे रात्रीच्या वेळी ते सुरगाणा येथील तान नदीचे पात्र ओलांडून जात होते. यावेळी नदीला पूर असल्याने पाणी पुलावरून वाहत होते. रात्रीची वेळ असल्याने पुल ओलांडताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे लक्ष्मण गावित वाहुन गेल्याचे सांगण्यात येत आहे.