नाशिक(येवला)-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. आत्तापर्यंत अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाने आपला विळखा घातला आहे. नाशिकच्या येवला शहरातील एका नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे येवल्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आठवर गेली आहे.
येवल्यात नर्सला कोरोनाची बाधा; शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ वर - कोरोनाबाधित
नाशिकच्या येवला शहरातील एका नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे येवल्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आठवर गेली आहे. ही नर्स येवला शहरातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आली होती.
ही नर्स येवला शहरातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आली होती. नर्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नर्सला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना चाचणी केलेल्या 30 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. येवला बाभूळगाव येथील कोविड-19 केंद्रात 67 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर 174 जणांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात बाधितांचा आकडा ३०० च्या घरात असून त्यापैकी एकट्या मालेगावात 250 पेक्षा जास्त रुग्ण आहेत.