महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीज पडून कांदा चाळ जळून खाक; शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान - लेटेस्ट न्यूज इन नाशिक

जायखेडा परिसरात वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी जयपूर मेंढीपाडे येथील रतनसिंग प्रतापसिंग सूर्यवंशी यांच्या शेतातील राहत्या घरावर वीज पडली. त्यामुळे लागलेली आग कांदा चाळीपर्यंत पोहोचल्याने घरातील संसारोपयोगी व शेतीउपयोगी साहित्य तसेच कांदा साठवलेली चाळ जळून खाक झाली.

Nashik
जळून खाक झालेली कांदाचाळ

By

Published : Jun 2, 2020, 1:57 AM IST

नाशिक- बागलाण तालुक्यातील जायखेडापासून जवळच असलेल्या जयपूर मेंढीपाडे शिवारातील शेतात वीज पडून कांद्याची चाळ व राहत्या घराचे झाप जळून खाक झाले. यात तीनशे क्विंटल कांद्यासह संसारोपयोगी व शेतीउपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. जायखेडा नांदीन रस्त्यावरील जयपूर मेंढीपाडे शिवारातील रतनसिंग प्रतापसिंग सूर्यवंशी या शेतकऱ्यांच्या शेतात ही घटना घडली.

सोमवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास जायखेडा परिसरात वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी जयपूर मेंढीपाडे येथील रतनसिंग प्रतापसिंग सूर्यवंशी यांच्या शेतातील राहत्या घरावर वीज पडली. यावेळी लागलेली आग झापासह लगतच्या कांदा चाळीपर्यंत पोहोचल्याने घरातील संसारोपयोगी व शेतीउपयोगी साहित्य तसेच कांदा साठवलेली चाळ जळून खाक झाली. यात शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details