नाशिक - जिल्ह्यातील चाडेगाव शिवारातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली. गेल्या पंधरा दिवसात या भागात तीन बिबट्यांना जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले होते. मात्र,अजूनही परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं दिसून येतंय.
नाशिक रोड परिसरातील नारायण अरिंगळे यांच्या पाडेगाव परिसरात असलेल्या विहिरीमध्ये एक बिबट्या पडला असल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या विहिरीत पडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळच्या सुमारास काही नागरिक या ठिकाणाहून जात असताना बिबट्या विहरीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.