महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये दिसला पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य - इंद्रधनुष्य नाशिक

सूर्याभोवती पूर्ण आकृती इंद्रधनुष्य पाहण्याचा योग नाशिककरांना मिळाला. सूर्याच्या किरणांनी तयार झालेला हा इंद्रधनुष्य अद्भुत दिसत होता.

इंद्रधनुष्य

By

Published : Aug 25, 2019, 3:06 AM IST

नाशिक- जिल्ह्यातील सर्वच परिसरात नागरिकांना शनिवारी एक दुर्मिळ प्रकार अनुभवायला मिळाला. सूर्याभोवती पूर्ण आकृती इंद्रधनुष्य पाहण्याचा योग नाशिककरांना मिळाला. खरंतर इंद्रधनुष्य पावसाळ्यात अनेक वेळा पाहायला मिळतो. मात्र सूर्याला रिंगण केलेला पूर्ण गोल इंद्रधनुष्य पाहणे दुर्मिळ असते. त्यामुळे सूर्याच्या किरणांनी तयार झालेला हा इंद्रधनुष्य अद्भुत दिसत होता.

इंद्रधनुष्य

पावसाळ्यात इंद्रधनुष्य हा अर्धगोलाकार दिसतो. परंतु, नाशिक जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य बघावयास मिळाला. सूर्याभोवती आकाशात ऊंचीवर तयार झालेल्या ढगांवर सूर्यकिरण पडल्याने हे पूर्ण गोल आकार इंद्रधनुष्य पाहायला मिळाल्याचे तज्ञांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details