महाराष्ट्र

maharashtra

नाशिक : संकटांना कंटाळून शेतकऱ्याने चार एकर द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड

By

Published : Oct 11, 2020, 1:03 PM IST

अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि कोरोनासारख्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खर्च करून एक रुपयाही निघत नसल्याने सोमठाण देश येथील एका संतप्त शेतकऱ्याने चार एकरातील द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली

शेतकऱ्याने चार एकर द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड
शेतकऱ्याने चार एकर द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड

नाशिक -सातत्याने येणाऱ्या संकटांना कंटाळूनजिल्ह्याच्या येवला तालुक्यातील सोमठाण देश येथील शेतकरी चंद्रभान पिंपळे यांनी आपल्या चार एकर द्राक्ष बागावर कुऱ्हाड चालवून संपूर्ण बाग तोडून टाकली.

शेतकऱ्याने चार एकर द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड

कर्ज काढून सहा वर्षांपूर्वी चार एकरमध्ये या शेतकऱ्याने द्राक्षांची लागवड केली होती. पण सातत्याने अतिवृष्टी, दुष्काळाचा सामना करावा लागला. तर, यंदाचा मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण व त्यात कोरोनाचे संकट यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करून एक रुपया देखील उत्पन्न मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यात आता कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याने अखेर हताश होऊन चार एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली.

मागील वर्षीच्या सुरुवातीला झालेली अतिवृष्टी आणि यंदा सतत पडणारा पाऊस व नेहमीचे ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबाग विळख्यात सापडल्याने शेतकऱ्यांचा खर्च देखील वसूल झालेला नाही. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही द्राक्ष बागेतून काहीच उत्पन्न वसूल न झाल्याने संतप्त शेतकऱ्याने चार एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालून संपूर्ण बाग तोडून टाकली.

हेही वाचा -परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान शेतकरी हवालदिल; मदतीची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details