येवला ( नाशिक)- कांद्याच्या दरासंदर्भात येवल्यातील व नाशिक जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या एक शिष्टमंडळाने राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी कांद्याच्या कोसळणाऱ्या दराबाबत चर्चा झाली. तसेच कांद्याला सध्या 200 ते 600 रुपये भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसून कांद्याला 300 ते 500 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी येवला तालुक्यातील प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री बच्चू कडु यांची भेट घेतली.
कांद्याच्या दरासंदर्भात येवल्यातील शिष्टमंडळाने घेतली बच्चू कडू यांची भेट - कांद्याला भाव मिळावा
कांद्याला सध्या 200 ते 600 रुपये भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसून कांद्याला 300 ते 500 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी येवला तालुक्यातील प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली.
येवला व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर दिवसेंदिवस कोसळले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विक्री झालेल्या कांद्याला किमान 300 ते 500 रुपये अनुदान मिळावे. तसेच साठवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे विक्री होणाऱ्या कांद्याची दोन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी करावी. या मागण्यांसाठी येवला व नाशिक जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने बच्चू कडूंची अमरावती निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी येवल्यातील शिष्टमंडळाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतली. तसेच कोसळणाऱ्या कांद्याचे बाजार भावाला केंद्र सरकारचे आयात निर्यातीचे धोरण कारणीभूत असल्याची टीका शेतकऱ्यांनी यावेळी केली. तसेच कांदा प्रश्नी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदें, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन,संघटक किरण चरमळ आदी उपस्थित होते.