नाशिक - जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात हलगर्जीपणा करत चुकीची आकडेवारी देऊन प्रशासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या विरोधात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी तक्रार दिली आहे. त्या आधारे रवींद्र शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोना काळात प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या अतिरिक्त 'सीईओ' शिंदेंवर नाशकात गुन्हा दाखल - नाशिक कोरोना आकडेवारी बातमी
कोरोना काळात हलगर्जीपणा व चुकीची आकडेवारी देऊन प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाघमारे यांनी ही कारवाई केली आहे.
राजपत्रित वर्ग-1 च्या अधिकाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दाखल झालेला हा राज्यातील पहिलाच गुन्हा आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी मालेगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली होती. यामुळे परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी मोठा हातभार देखील लाभला होता. मात्र, असे असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अधिकारी रवींद्र शिंदे यांच्यावर कोरोनाग्रस्त रुग्णांचा शोध घेण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शासनाच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमाचे क्षेत्रीय स्तरावर समन्वय करण्यासाठी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी ही जबाबदारी पार पडताना दुर्लक्ष केल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने कारणे दाखवा तसेच समज नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र, तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करtन प्रशासनाची दिशाभूल केल्याने त्यांच्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -येवल्यात अनेक पिके पाण्याखाली, शेतकरी अडचणीत