महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : सामनगाव येथील 9 वर्षीय मुलाचा खून; संशयित पोलिसांच्या ताब्यात - 9 year old boy murder dubere news

सामनगाव रोडवरील गाडेकर मळ्यातील नऊ वर्षीय मुलाचा खून झाला आहे. ही घटना सिन्नर येथील डुबेरे गाव परिसरात घडली. रामजी लालबाबू यादव (वय ९), असे मृत मुलाचे नाव आहे. घटनेतील संशयित आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलाच्या खुनाचे नेमके कारण समोर आलेले नाही.

Ramji Yadav murder dubere village
रामजी यादव खून डुबेरे

By

Published : Dec 2, 2020, 3:47 PM IST

नाशिक - सामनगाव रोडवरील गाडेकर मळ्यातील नऊ वर्षीय मुलाचा खून झाला आहे. ही घटना सिन्नर येथील डुबेरे गाव परिसरात घडली. या घटनेमुळे नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. रामजी लालबाबू यादव (वय ९), असे मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सामानगाव रोड येथील रामजी लालबाबू यादव याला काल शेजारी राहाणार्‍या संशयित तरुणाने बरोबर नेले. त्यानंतर तरुण रात्री एकच्या सुमारास घरी आल्यानंतर मुलाच्या पालकांनी त्यास रामजीबाबत विचारले. मात्र, तरुणाने मुलाच्या पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच पालकांना शिवीगाळ केली. त्यातून संशय आल्याने पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी व पथकाने तपास सुरू केला. अखेर आज सकाळी सिन्नर येथील डुबेरे गाव परिसरात मुलाचा मृतदेह आढळून आला. घटनेतील संशयित आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलाच्या खुनाचे नेमके कारण समोर आलेले नाही.

हेही वाचा -नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखावर; रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.46 टक्के

ABOUT THE AUTHOR

...view details