महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक; आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार - A 14-year-old girl was raped by her mothers lover

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आला असून संशयीत आरोपी आकाश विरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात बाल लैगिक अत्याचार,पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेयसीच्या मुलीवर बलात्कार
प्रेयसीच्या मुलीवर बलात्कार

By

Published : Mar 1, 2021, 5:24 PM IST

Updated : Mar 1, 2021, 6:01 PM IST

नाशिक- प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना निफाट तालुक्यातील बेहड येथे घडली आहे. आकाश सचिन सूर्यवंशी (वय २५) असे त्या संशयित प्रियकराचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात बाल लैंगिग अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

ईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार
मावशीने पडीतीला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले...पीडित मुलीच्या आईचे आणि आरोपीचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बेहड येथील राहत्या घरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपीने पीडित मुलीवर बळजबरी करत बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने ही माहिती आपल्या मावशीला दिली. त्यानंतर मावशीने थेट पिंपळगाव पोलीस ठाणे गाठले आणि संशयित सावत्र बापाविरोधात तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल करत अटक
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आला असून संशयीत आरोपी आकाश विरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात बाल लैगिक अत्याचार,पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयित अरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी करत आहे.

Last Updated : Mar 1, 2021, 6:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details