येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत मतदान सुरळीत सुरु आहे. या निवडणुकीत युवकांपासून ते वृद्धांपासून सर्वजण मतदानाचा हक्क बजावत आहेत. दरम्यान, अंगणगाव येथे एका 98 वर्षीय आजोबांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
१३८० अधिकारी, कर्मचारी नियुक्त -
६९ ग्रामपंचायतींसाठी ४० निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर एकूण १३८० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २०३ मतदान केंद्र असणार असून या प्रत्येक केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन सहायक, प्रत्येकी एक शिपाई व पोलीस असे एकूण ६ कर्मचारी असणार आहेत.