नाशिक- एप्रिल महिन्यात देशात सर्वधिक रुग्ण नाशिक जिल्ह्यात होते. या काळात जिल्ह्यात 45 हजार पेक्षाही अधिक ऍक्टिव्ह रुग्ण होते. अशा परिस्थितीत शहरात कोरोना उद्रेक झाला होता. अनेक ठिकाणी रूग्णांना बेड, ऑक्सिजन, इंन्जेक्शनची टंचाई होती, तर स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रीघ लागली होती.
मृतांची अधिकृत संख्या अद्यापही जाहीर केलेली नाही
अनेकदा प्रशासन मृतांचे आकडे लपवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. आता महापालिकेकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील चार महिन्यात नाशिक शहरात तब्बल 9 हजार 112 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. या अहवालानुसार मृत्युत 5,558 पुरुष, तर 3,554 महिला आहेत. मृतांचा आकडा अधिक आहे. मात्र असे असले तरी महानगरपालिकेने कोरोनामुळे मृत झालेल्या नागरिकांची अधिकृत संख्या अद्याप जाहीर केलेली नाही.
जानेवारी ते एप्रिल 2021 या कालावधी मध्ये 9 हजार 112 मृत्यु
गेल्या वर्षी कोरोनाने शहरात हाहाकार उडविला होता. डिसेंबर 2020 अखेर पर्यंत पहिली लाट ओसरली होती. जानेवारी 2021 मध्ये शहर कोरोना संकटातून बाहेर पडले होते. परंतु, त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अधिक तीव्रता धारण केली. त्यात विक्रमी रुग्ण संख्या नोंदविली गेली. एकट्या नाशिक शहारत लाखो जणांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे मृतांची संख्या देखील वाढली होती. मात्र किती रुग्ण कोरोनामुळे दगावले यासंदर्भातील आकडेवारी अद्यापही बाहेर आलेली नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाला पाठविलेल्या आकडेवारीमध्ये एकुण मृतांचा आकडा प्राप्त झाले आहे. त्यात जानेवारी ते एप्रिल 2021 या कालावधी मध्ये 9 हजार 112 मृत्यु झाले. चार महिन्यातील आकडेवारीचा विचार करता त्यात सर्वाधिक कोरोना संसर्गाने रुग्ण मृत झाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एप्रिलमध्ये सर्वाधिक मृत्यु