नाशिक - मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथे एका ट्रकच्या जोरदार धडकेत ९ गायींचा मृत्यु झाला. तर ३ गायी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर इगतपुरी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.
ट्रक चालकास इगतपुरी पोलिसांनी घेतले ताब्यात -
नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी येथे रस्ता ओलांडनाऱ्या एका गायीच्या कळपाला नाशिकच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या धडकेत नऊ गायी जागीच ठार झाल्या तर पाच गायी जखमी झाल्या आहेत. जखमी झालेल्या गायीना एका पिकअप गाडीतून पाथर्डी फाटा येथील मंगलरूप गो शाळेत उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेनंतर ट्रक चालकास इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अपघातानंतर नाशिक- मुंबई हायवे वरील वाहतूक काही काळ ठप्प झाले होते.