दिंडोरी (नाशिक) - 82 लाखाची चोरीची दारू व मालवाहू ट्रक असा एकूण 90 लाख 35 हजार 45 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. जानोरी येथील अशापुरा गोडाऊनमध्ये स्थानिक गुन्हे शाखा विभागाने ही कारवाई केली.
ओळखीच्या ट्रान्स्पोर्ट कंपनीकडे संपर्क

धर्मेंद्र शेरसिंग मंडलोई (रा. नाशिक म्हसरूळ) यांनी त्यांच्या ओळखीचे ट्रान्सपोर्ट विजय गुलशन मागो नाशिक यांना तीन वर्षापासून ओळखत असल्याने १६ डिसेंबररोजी रात्रीच्या सुमारास मोबाइलवरून अकोला येथे जाण्यासाठी 20 टन वजन क्षमता असलेली गाडी पाहिजे, असे सांगितले. त्यावेळी संबंधित ट्रान्सपोर्ट (एम एच 15 डी के 4955) क्रमांकाची गाडी लोडिंगसाठी १७ डिसेंबरला सकाळी दहा वाजता कादवा म्हाळुंगी येथील परनॉर्ड रिकार्ड इंडिया (सिग्राम) कंपनीवर पाठवली.
बनाव उघड
या गाडीमध्ये चालक इजाज खान समद खान याने विदेशी दारूचे मटेरियल लोड कले. मात्र खान याने गाडी अकोल्याला नेण्याऐवजी अज्ञात ठिकाणी नेली. गाडीचे जीपीएस तोडून टाकले. दारूचे बॉक्स जानोरी येथील गोडाऊनमध्ये उतरून ठेवून पुन्हा ट्रक मालेगाव परिसरात अज्ञातस्थळी लावला आणि ट्रक चोरीला गेल्याची खोटी तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांना ही बनवाबनवी लक्षात आली.