नाशिक:मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव परिसरात पाचोरा वणी फाट्यावर दुचाकीने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. या अपघातामध्ये आठ वर्षीय लहान मुलाच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला, तर आई-वडील आणि २ वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाले. ओम राकेश खैरनार असे मृत मुलाचे नाव आहे.
पिंपळगाव परिसरात दुचाकीचा अपघात; ८ वर्षीय बालक जागीच ठार - पिंपळगाव दुचाकी अपघात
पिंपळगाव परिसरात पाचोरा वणी फाट्यावर दुचाकीने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. या अपघातामध्ये आठ वर्षीय लहान मुलाच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. डॉ. राकेश खैरनार (वय ३५), डॉ. मनीषा खैरनार (वय ३२), दक्ष राकेश खैरनार (वय २ ) हे जखमी झाले.
![पिंपळगाव परिसरात दुचाकीचा अपघात; ८ वर्षीय बालक जागीच ठार bike accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7283910-1061-7283910-1590028844013.jpg)
दुचाकी अपघात
पाचोरा वणी फाट्यावर बुधवार रात्री मालेगावकडून दुचाकीने चार जणांचे कुटुंब नाशिक येथे जात होते. त्याचवेळी डिझेल संपल्याने महामार्गावर बंद पडलेल्या ट्रॅक्टरला खैरनार यांच्या दुचाकीची अंधारात जोराची धडक दिली.
यात दुचाकीस्वार डॉ. राकेश खैरनार (वय ३५), डॉ. मनीषा खैरनार (वय ३२), दक्ष राकेश खैरनार (वय २ ) हे जखमी झाले. तर ओम राकेश खैरनार (वय ८) याचा जागीच मृत्यू झाला. जखमींना पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.