मालेगाव (नाशिक)- शहरात सर्वसामान्य नागरिकांबरोबर आता पोलीस कर्मचारी हे देखील कोरोनाबाधित होत असल्याने पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त पोलीस हे मालेगाव शहरात असल्याने पोलीस दलात भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत साधारण 70 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून अनेकांचे अहवाल प्रलंबित आहे. आज मालेगावात 8 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहे. जिल्ह्याची कोरोनाग्रस्तांची 371 वर पोहोचली असून एकट्या मालेगावात 331 कोरोनाबाधित आहेत.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 17 बाधित असून इतर ग्रामीण भागातही 17 बाधित आहे. तर अन्य ठिकाणाहून आलेले सहा आणि उर्वरित 12 जणांचा मृत्यू झाल्याचे नोंद नाशिक जिल्ह्यात झालेली आहे.