महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मिटला; 24 धरणांत 79 टक्के पाणी साठा - darana dam

आता पर्यंत झालेल्या पावसामुळे, जिल्ह्यातील 24 धरणांत एकूण 79 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणं 91 टक्के भरले आहे. या धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

नाशिक : 24 धरणांत 79 टक्के पाणी साठा

By

Published : Aug 8, 2019, 9:04 PM IST

नाशिक - आतापर्यंत झालेल्या पावसामुळे, जिल्ह्यातील 24 धरणांत एकूण 79 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नाशिककरांचा येणाऱ्या वर्षभरासाठीचा पाणी प्रश्न मिटला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणं 91 टक्के भरले आहे. या धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

नाशिक : 24 धरणांत 79 टक्के पाणी साठा

नाशिक जिल्ह्यात लहान मोठी एकूण 24 धरणे आहेत. आजच्या घडीला या धरणांमध्ये 52166 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी हा साठा 39642 दशलक्ष घनफुट इतका होता. नाशिक जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, भोजपूर, वालदेवी, हरणबारी, केळझर ही धरणे शंभर टक्के भरली असून यातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच गंगापूर गौतमी,काश्यपी,गोदावरी ,करंजवण, मुकणे ही धरणे 90% पेक्षा अधिक भरली आहेत.

जिल्ह्यतील धरणांमधून होत असलेला विसर्ग -


गंगापुर धरण - 5104 क्युसेस
काश्यपी धरण - 1055 क्यूसेस
गौतमी गोदावरी - 570 क्यूसेस
दारणा धरण - 5360 क्युसेस
नांदुर मध्यमेश्वर धरण - 36142क्यूसेस
भावली धरण - 290 क्युसेस
आळंदी धरण - 961 क्युसेस
पालखेड धरण - 11788 क्युसेस
चणकापूर धरण - 5586 क्युसेस
हरणबारी धरण - 2588 क्युसेस
पुनद धरण - 1342 क्युसेस
वालदेवी - 1305 क्युसेस
वाघाड - 1995 क्युसेस

ABOUT THE AUTHOR

...view details