नाशिक :कोरोना काळात दर महिन्याला राज्य सरकारने 77 लाख क्विंटल स्वस्त धान्याचे वाटप केल्याची माहिती राज्याचे अन्न धान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात गरीब आणि सर्वसामान्य नागरीकांची उपासमार होऊ नये. ह्यासाठी राज्य सरकारन आणि केंद्र सरकारकडून मोफत तसेच स्वतः दरात अन्न धान्याचा पुरवठा केला. ह्यात दर महिन्याला राज्यातील 52 हजार 424 स्वस्त धान्य दुकांच्या माध्यमातून 77 लाख क्विंटल धान्याचे वाटप करण्यात आले. अन्न सुरक्षा योजना, एपीएल केशरी कार्डधारक तसेच आत्मनिर्भर योजनेअंतर्गत रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांनादेखील धान्याचे वाटप करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
मार्च, एप्रिल, मे, जून 2020 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 6.68 कोटीं कार्डधारक नागरिकांना दर महिना 36 लाख क्विंटल धान्याचे वाटप करण्यात आले. ह्यात 1 रुपयात भरड, 2 रुपयात गहू आणि तीन रुपयात तांदळाचे वाटप करण्यात आले. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल आणि जून महिन्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 6 कोटी 30 लाख 38 हजार ( 90 टक्के) लाभार्थ्यांना 31 लाख 51380 क्विंटल तांदळाचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 36 लाख 29 हजार 382 लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून धान्याचे वाटप करण्यात आले.
पीएमजीकेवाय अंतर्गत मोफत डाळ वाटप
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र 7 कोटी लाभार्थ्यांना एप्रिल मे जून 2020 ह्या तीन महिन्यात मोफत प्रति कार्ड एक किलो अशी 97 क्विंटल मोफत डाळ वितरित करण्यात आली.
केशरी कार्ड धारकांनादेखील सरकारकडून दिलासा
कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक केशरी कार्डधारकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडून 400 कोटी रुपये मंजूर करून घेत 21 आणि 22 रुपयांनी गहू आणि तांदळाची खरेदी केली. तर, 3 कोटी 8 लाख केशरी कार्ड धारकांना 8 रुपये किलो गहू आणि 9 रुपये किलो तांदुळ ह्या दराने 1 कोटी 58 लाख (52 टक्के) नागरिकांना 8 लाख 18 हजार क्विंटल धान्याचे वाटप केले.
रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत तांदूळ वाटप