नाशिक - मागील दोन महिन्यांपासून हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात काम करणाऱ्या 71 पोलीस कर्मचाऱ्यांना आता काही दिवस विश्रांती दिली आहे. मात्र, या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना घरी जाऊ नदेता, त्यांना आडगाव येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात क्वारंटाइन करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांची 14 दिवसांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिक : मालेगाव येथे कार्यरत 71 पोलीस 'क्वारंटाइन' - नाशिक ग्रामीण पोलीस बातमी
मालेगावसारख्या कोरोना हॉटस्पॉटच्या ठिकाणी काम करणाऱ्या 71 पोलीस कर्मचाऱ्यांना आडगाव येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे.
कोरोना हॉटस्पॉट परिसरात काम केल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लगण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. यामुळे खबरदारी म्हणून ग्रामीण पोलीस दलाने ही व्यवस्था केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये काम करणाऱ्या साधारण दीडशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यात दुर्दैवाने तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे आता विशेष खबरदारी घेतली जात आहे. आता बरेच कर्मचारी हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर काहींवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -मालेगावच्या जीवनचक्राची चाके पुन्हा सुरू, यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी