नाशिक-जिल्ह्यात दोन भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर चालत्या गाडीवर झाड कोसळून तीन शिक्षक जागीच ठार झाले. तर वाडीवरे येथे कंटेनर आणि कारच्या अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना घडली.
नाशिक कळवण रस्त्यावर दिंडोरी नजीक वलखेड फाट्यावर बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चालत्या आर्टिका वाहनावर झाड कोसळून झालेल्या अपघातात अलंगुन ता. सुरगाणा येथील तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वनीकडून नाशिककडे जाणाऱ्या (एम एच 15 एफ एन 0997ः या पांढऱ्या रंगाच्या मारुती आर्टिकावर वलखेड फाट्यावर वाळलेले झाड अचानक गाडीवर कोसळले. या अपघातात गाडीच्या मागील सीटवर बसलेले तीन शिक्षक दत्तात्रय गोकुळ बच्छाव (वय51) राहणार किशोर सूर्यवंशी मार्ग दिंडोरी रोड नाशिक रामजी देवराम भोये (वय 49) नाशिक नितीन सोमा तायडे( वय32 रा. रासबिहारी लिंक रोड नाशिक) जागीच ठार झाले. गाडीवरील पुढील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तीनही शिक्षक सुरगाणा येथील शहीद भगतसिंग माध्यमिक विद्यालय अलंगुन येथील असल्याचे समजते.
हेही वाचा-देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासूनच पॉर्न फिल्मचे शुटिंग, नाना पटोलेंचा आरोप