नाशिक - मालेगाव शहरामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. आता याचा शिरकाव मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातही झाल्याचे समोर आले आहे. दाभाडी येथे सात नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
मालेगाव तालुक्यातील दाभाडीत आढळले ७ करोनाबाधित रुग्ण - मालेगाव कोरोना अपडेट
2 मे रोजी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील ५६ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी काही रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण दाभाडी परिसरातील आहेत यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नाशिक शहरातही सोमवारी एका महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे नाशिक शहरातील कोरोना बाधितांची संख्या १७ वर पोहोचली आहे. दाभाडीतील नव्या रुग्णांमुळे नाशिक ग्रामीणमधील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४ झाली आहे. तर एकट्या मालेगाव शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३३१ वर जाऊन पोहचली आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील ३७८ कोरोनाबाधित आहेत.