नाशिक - मालेगावमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, नाशिक शहरात दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. गेल्या 24 तासात 102 कोरोना संशयित दाखल झाले असून कोरोनाबाधितांचा आकडा 69 वर पोहोचला आहे.
नाशिक शहरात कोरोनाबाधितांचा आकडा 69 वर, गेल्या 24 तासात 102 संशयित दाखल - नाशिक कोरोनाबाधितांचा आकडा
मालेगावात आतापर्यंत 685, तर नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 111 इतकी झाली असून नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 904 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह अढळून आले असून यात 46 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 654 जण कोरोना मुक्त झाले आहे.
मालेगावात आतापर्यंत 685, तर नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 111 इतकी झाली असून नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 904 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह अढळून आले असून यात 46 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 654 जण कोरोना मुक्त झाले आहे. मागील 24 तासात नाशिकच्या रुग्णालयामध्ये 102 कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले असून, या सर्व रुग्णांचे स्वब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
नाशकातील 'या' भागात रुग्णसंख्येत वाढ -
नाशिक शहराच्या अंबड सातपूर लिंक रोड, सिडको, सातपूर, वडाळा, पंचवटी, हिरावाडी आदी भागात रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे हा परीसर कंटनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला असून, या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.