नाशिकCrop Insurance :नाशिक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाचा फटका 50 हजार शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं हाता तोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं शेतकरी हाताश झाला आहे. मात्र, गारपिटीनंतर अवघ्या 72 तासांत 50 हजार शेतकऱ्यांपैकी केवळ 18 हजार शेतकऱ्यांनी पीक विम्याचा फायदा घेतला आहे. पीक विमा एक रुपयात मिळत असतानाही अनेक शेतकऱ्यांनी त्याकडं दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे.
70 हजार शेतकऱ्यांचं नुकसान :नाशिक जिल्ह्यात पीक विम्याला शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 5 लाख 88 हजार 648 शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा काढला आहे, तर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं 70 हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं जवळपास 34 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
द्राक्ष पीक विम्यापासून वंचित : नाशिक जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पावसामुळं प्राथमिक 11 हजार 652 हेक्टरवरील द्राक्ष पिकांचं, 10 हजार 663 हेक्टरवरील कांदा पिकांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात 924 गावातील भातशेतीला मोठा फटका बसला आहे. मात्र, द्राक्ष उत्पादक शेतकरी पीकविमापासून वंचित आहेत.
एक रुपयाच्या पीक विम्यात 70 टक्के जोखीम स्तर :पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामा प्रमाणं रब्बी हंगामातही प्रति अर्ज एक रुपया भरून पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. मात्र, या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे. पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी विमा कंपनीनं 70 टक्के जोखीम स्तर निश्चित केला आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू :नाशिक जिल्ह्यात हरभरा गहू, उन्हाळी भात पिकांसाठी पीक विमा काढता येणार आहे. पिकांसाठी 70 टक्के जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करणं आवश्यक आहे. शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर स्वतः तसंच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी, सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत अर्ज करता येणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून रब्बी हंगामात हरभरा पिकांसाठी तसंच उन्हाळी धान पिकांसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा लागू आहे.
हेही वाचा -
- Hail In North Maharashtra : उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा फटका, पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान
- Maha Weather Update : राज्यातील 15 जिल्ह्यात येलो अलर्ट; गोदाकाठ परिसरात गारपीट
- नाशिक : तळवाडे दिगर येथे तुफान गारपीट, कांद्यासह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान