नाशिक -धावती रेल्वे पकडताना एका 61 वर्षीय महिलेचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला. मनमाड येथील रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. सुशील चौधरी(चंदगड ,मध्यप्रदेश ) असे या महिलेचे नाव आहे. मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूरला जाण्यासाठी सुशील रेल्वे स्थानकात आल्या होत्या. एलटीटी -भागलपूर या गाडीने त्यांना जायचे होते. मात्र, येण्यास उशीर झाल्यामुळे चालू गाडी पकडण्यासाठी त्या पळत असताना त्यांचा पाय घसरून हा अपघात झाला.
धावती रेल्वे पकडताना वृद्ध महिलेचा गाडीखाली सापडून मृत्यू - woman died under railway
एलटीटी -भागलपूर ही धावती रेल्वे पकडताना एका 61 वर्षीय महिलेचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला. मनमाड येथील रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.
हेही वाचा - पुणे मेट्रोचे प्रकल्प कामाला मोठे यश.. २५ दिवसात बोगदा केला पूर्ण, पाहा व्हिडिओ
सुशील मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत. त्या शिर्डी येथील रुग्णालयात आल्या होत्या. रुग्णालयातील काम झाल्यानंतर त्या आपल्या घरी निघाल्या होत्या. मात्र, चालू गाडी पकडत असताना ही दुर्दैवी घटना घडली. रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.