नाशिक - मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. आज एकाच कुटुंबातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उपचारा दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगावात आतापर्यंत कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या 11 झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३० वर पोहोचला असून एकट्या मालेगावमध्ये ११५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मालेगावात कोरोनाचे थैमान; एकाच दिवशी सहा पॉझिटिव्ह, दोन जणांचा मृत्यू - malegaon nashik
गेल्या ८ एप्रिलला मालेगावमध्ये एकाच दिवशी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. केवळ १५ दिवसात हा आकडा ११५ वर जाऊन पोहोचला आहे. मालेगावमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता हा परिसर हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. ना
![मालेगावात कोरोनाचे थैमान; एकाच दिवशी सहा पॉझिटिव्ह, दोन जणांचा मृत्यू malegaon corona hotspot कोरोना अपडेट मालेगाव मालेगाव नाशिक malegaon nashik मालेगाव कोरोना हॉटस्पॉट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6923133-578-6923133-1587724356778.jpg)
गेल्या ८ एप्रिलला मालेगावमध्ये एकाच दिवशी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. केवळ १५ दिवसात हा आकडा ११५ वर जाऊन पोहोचला आहे. मालेगावमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता हा परिसर हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात आले असून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.
अनेक जण कोरोना आजाराचे लक्षण असताना देखील आजार दडून ठेवत असल्याने मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. मालेगावमधील नागरिकांनी तपासणीसाठी येत असलेल्या आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. तसेच खरी माहिती सांगावी. त्यामुळे मालेगावमधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.