नाशिक- गंगापूर धरणात मागील जून महिन्यात पाणीसाठा केवळ 20 टक्के होता. मात्र, गेल्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणात 53 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पाणी कपात अंशत: कमी केली आहे. याआधी दर गुरूवारी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा खंडित करून कोरडा दिवस पाळला जात होता. तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपूर्ण शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
गंगापुरचा 'कोरडा गुरूवार' संपला गंगापूर धरणात 53 टक्के पाणी - 53 percent water in Gangapur Dam
गंगापूर धरणात मागील जून महिन्यात पाणीसाठा केवळ 20 टक्के होता. मात्र गेल्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणात 53 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
शहरात गेल्या 30 जूनपासून सर्व विभागात एकच वेळ पाणी पुरवठा करण्यात येत होता. महापालिकेच्या सहा पैकी चार विभागात दोन वेळा पाणी पुरवठा होत होता. तो एकवेळ करण्यात आला होता. पावसाने ओढ दिल्याने दर गुरूवारी कोरडा दिवस पाळून पाणी पुरवठाच न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून ५३ टक्के झाला आहे. त्यामुळे पाणी कपात अंशत: रद्द करण्यात आली आहे. महापालिकेत आज आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानस यांच्याबरोबरच गटनेते आणि अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या वेळी, हा निर्णय घेण्यात आला.